Skip to main content

जीनाचे चौदा मुद्दे

   🎯🎯 जीनाचे चौदा मुद्दे 🎯🎯

👉 नेहरू रिपोर्ट हा मुस्लिम लीगला मान्य नसल्यामुळे जीनांने मुस्लिम लीगच्या दृष्टीकोनातून पुढील १४ मुद्दे प्रसिद्ध केले ते पुढीलप्रमाणे आहेत.

 👉 जीना यांचे चौदा मुद्दे 👇👇

    १) हिंदी राज्यघटना संघात्मक ठेवून प्रांताकडे शेषाधिकार असावे.

    २) देशातील सर्व घटक राज्यांना सारखेच स्वतंत्र प्राप्त व्हावे.

    ३) सर्व कायदेमंडळात अल्पसंख्याकांना योग्य व परिणाम कारक प्रतिनिधित्व मिळावे.

     ४) केंद्रीय कायदे मंडळात एकूण सभासदांच्या १३ प्रतिनिधी मुस्लिम असावे.

     ५) स्वतंत्र मतदार संघ अस्तित्वात राहतील एखाद्या समाजाला स्वतंत्र मतदार संघाचा त्याग करायचा असेल तर करता येईल.

     ६) बंगाल पंजाब वायव्य सरहद्द प्रदेशाची पुनर्रचना करीत असताना मुस्लिम मताधिक्य कमी येणार नाही याची काळजी घ्यावी.

       ७) मुंबई प्रदेशापासून सिंध प्रदेश वेगळा करावा.

       ८) सर्व समाजाला आपल्या धर्माचे आचरण करण्यास प्रचार आणि धार्मिक शिक्षण देण्यास पूर्ण स्वतंत्र राहील.

        ९) वायव्य सरहद्द प्रदेशामध्ये आणि बलुचिस्तान या प्रदेशमध्ये इतर प्रांतासारखा राजकीय सुधारणा राबवाव्यात.

         १०) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनात मुस्लिमांना योग्य त्या नोकऱ्या प्राप्त व्हाव्यात.

         ११) कोणत्याही कायदे मंडळात समाजाविषयी ठराव पास होत असेल तर त्या ठरावाला त्या समाजातील ३४ सभासदांनी जर विरोध दर्शविला तर तो ठराव पास होऊ नये.

         १२) मुस्लिमांनी संस्कृती, भाषा, शिक्षण संस्था इत्यादींना संरक्षण प्राप्त होण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात.

        १३) प्रत्येक प्रांताच्या मंत्रीमंडळामध्ये १३ मुस्लिम सदस्य असले पाहिजेत.

         १४) केंद्रीय कायदे मंडळात बदल करायचा असेल तर त्यासाठी प्रांतीय कायदे मंडळाची समंती असावी.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना

 🎯 महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना 🎯 💥 महामंडळ 👉 स्थापना वर्ष 👉 मुख्यालय  १) कृष्णा खोरे विकास महामंडळ 👉 १९९६ 👉 पुणे  २) विदर्भ सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 नागपूर  ३) कोकण सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 ठाणे   ४) तापी सिंचन विकास महामंडळ 👉 1997 👉 जळगाव  ५) गोदावरी - मराठवाडा सिंचन विकास महामंडळ 👉१९९८ 👉 औरंगाबाद

लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने

🎯 लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने   🎯       १) सातारा (१८४८)          २) जैतपूर (१८४९)       ३) संभलपुर (१८४९)        ४) भघाट (१८५०)       ५) उदयपूर (१८५२)          ६) झांशी (१८५३)       ७) नागपूर (१८५४)          ८) करौली (१८५५)       ९) अवध (१८५६)

‘रौलट कायदा

🎯 🎯  ‘रौलट कायदा ’ 🎯🎯      या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली.भारतीयांनी या कायद्याला ‘काळा कायदा’ असे संबोधले. या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. ६ एप्रिल १९१९ मध्ये रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.  या लढ्यात पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले.यामध्ये अमृतसर हे शहर या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. येथील हरताळ प्रकरणी डॉ.सत्यपाल व सैफुद्दीन किचलु अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन निःशस्त्र, निरपराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेछूट, अमानुष गोळीबार केला गेला.  या हत्याकांडात सुमारे चारशे स्त्री-पुरु...