Skip to main content

Posts

Showing posts with the label विज्ञान

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार (Medicine Nobel Prize) 2019

🎖 वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर 🎖  👉 फिजिओलॉजी शाखेतील शोधासाठी       १) विल्यम जी केलिन ज्युनियर,       २) सर पीटर जे रॅटक्लिफ आणि       ३) ग्रेग एल सेमेन्जा  यांना संयुक्तपणे वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर झाले आहे. 👉 पुरस्कार - पेशींच्या ऑक्सिजन ग्रहणावर करण्यात आलेल्या संशोधनासाठी देण्यात आले आहे. 👉 या तिघांनाही कोशिकाएंच्या ऑक्सिजन ग्रहणावर करण्यात आलेल्या शोधासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 

जलप्रदूषके

   🎯🎯 जलप्रदूषके   🎯🎯 १) जैविक जलप्रदूषके :-  शैवाल, जिवाणू, विषाणू व परजीवी सजीव यांच्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. २) असेंद्रिय जलप्रदूषके :-  बारीक वाळू, धुलिकण,  आर्सेनिक, कॅडमिअम, शिसे, पारा यांची संयुगे व  किरणोत्सारी पदार्थांचे अंश. ३) सेंद्रिय जलप्रदूषके :- तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी तसेच कारखान्यातील उत्सर्जके.

आम्लवर्षा (Acid Rain )

 🎯🎯 आम्लवर्षा (Acid Rain ) 🎯🎯   👉 कोळसा, लाकूड, खनिज तेले यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फुरिक आम्ल, नायट्रस आम्ल व नायट्रीक आम्ल तयार होते.  👉 ही आम्ले, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्येमिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो. त्यालाच आम्लवर्षा म्हणतात.

महत्त्वाचे नैसर्गिक आम्ले

   🎯🎯  काही  महत्त्वाचे नैसर्गिक आम्ले 🎯🎯     पदार्थ/स्रोत  :- आम्ले  १) व्हिनेगर :- ॲसिटिक आम्ल  २) संत्रे :- सायट्रिक आम्ल  ३) चिंच :-  टार्टारिक आम्ल  ४) टोमॅटो :- ऑक्सॅलिक आम्ल  ५) दही :- लॅक्टिक आम्ल  ६) लिंबू :- सायट्रिक आम्ल

दूध : एक मिश्रण

   🎯🎯 दूध : एक मिश्रण 🎯🎯  👉 दूध हे पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि आणखी काही नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण आहे. दुधाच्या स्रोताप्रमाणे दुधातील विविध घटक पदार्थांचे प्रमाण वेगवेगळे असते.  👉 दूध द्रव अवस्थेत आढळते. दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्याच्यातील दुग्धशर्करा (Lactose) ह्या घटक पदार्थामुळे असते. म्हणजेच घटक पदार्थांचे गुणधर्म दुधात राखले जातात.

पाणी : एक संयुग

   🌎🌎 पाणी : एक संयुग 🌎🌎   👉 शुद्ध पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन ह्या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनलेले एक संयुग आहे. पाण्याचा स्त्रोत कोणताही असला तरी त्यातील ऑक्सिजन व हायड्रोजन ह्या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण 8:1 असेच असते.  👉 हायड्रोजन हा ज्वलनशील वायू आहे तर ऑक्सिजन वायू ज्वलनाला मदत करतो. मात्र, हायड्रोजन व ऑक्सिजन ह्या वायुरूप मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनलेले पाणी हे संयुग आग विझायला मदत करते. 

जेनेरिक औषधे

 🎯🎯 जेनेरिक औषधे 🎯🎯     💥 जेनेरिक औषधे यांना सामान्‍य औषधे असेही म्‍हणतात.     💥 या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्‍याही पेटेंट शिवाय केली जाते. ही औषधे ब्रॅन्‍डेड औषधांच्या समकक्ष व त्‍याच दर्जाची असतात.      💥  जेनेरिक औषध तयार करताना त्‍या औषधातील घटकांचे प्रमाण किंवा त्‍या औषधांचा फॉर्मुला तयार मिळत असल्‍यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो त्‍यामुळे जेनेरिक औषधांची किंमत ब्रॅन्‍डेड औषधांच्या किमतीपेक्षा तुलनेने खूप कमी असते. 

राजधातू (Nobel Metal)

🎯🎯 राजधातू (Nobel Metal)  🎯🎯     👉  सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडिअम व ऱ्होडिअम यांसारखे काही धातू राजधातू आहेत.      👉  ते निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. त्यांच्यावर हवा, पाणी, उष्णता यांचा सहजपणे परिणाम होत नाही.       👉 त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही.

सोन्याची शुद्धता

🎯🎯 सोन्याची शुद्धता :-  कॅरेट व टक्केवारी 🎯🎯          कॅरेट  👉 टक्केवारी      १)  24  👉 100      २)  22  👉 91.66      ३)  18  👉 75.00      ४)  14  👉 58.33      ५)  12  👉 50.00      ६)  10  👉 41.66