Skip to main content

‘रौलट कायदा

🎯🎯  ‘रौलट कायदा’ 🎯🎯
     या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली.भारतीयांनी या कायद्याला ‘काळा कायदा’ असे संबोधले. या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली.
गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. ६ एप्रिल १९१९ मध्ये रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.
 या लढ्यात पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले.यामध्ये अमृतसर हे शहर या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. येथील हरताळ प्रकरणी डॉ.सत्यपाल व सैफुद्दीन किचलु अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली.
या घटनेच्या निषेधार्थ १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन निःशस्त्र, निरपराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेछूट, अमानुष गोळीबार केला गेला.  या हत्याकांडात सुमारे चारशे स्त्री-पुरुष मरण पावले. असंख्य लोक जखमी झाले.
संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा लागू करून शासनाने
अनेकांना तुरुंगात डांबले.या हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर हा जबाबदार होता. या हत्याकांडाचा  निषेध म्हणून रविंद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या ‘सर’ या किताबाचा त्याग केला. पुढे या हत्याकांडाच्या चौकशीची मागणी भारतीयांनी केली. त्यामुळे सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली.

Comments

Popular posts from this blog

लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने

🎯 लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने   🎯       १) सातारा (१८४८)          २) जैतपूर (१८४९)       ३) संभलपुर (१८४९)        ४) भघाट (१८५०)       ५) उदयपूर (१८५२)          ६) झांशी (१८५३)       ७) नागपूर (१८५४)          ८) करौली (१८५५)       ९) अवध (१८५६)

प्रकाश परावर्तनाचे नियम

          🎯🎯  प्रकाश परावर्तनाचे नियम 🎯🎯  👉 प्रकाश परावर्तनाचे तीन नियम खालीलप्रमाणे आहेत.      १) आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात.      २) आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात.      ३) आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरूद्ध बाजूस असतात.

महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना

 🎯 महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना 🎯 💥 महामंडळ 👉 स्थापना वर्ष 👉 मुख्यालय  १) कृष्णा खोरे विकास महामंडळ 👉 १९९६ 👉 पुणे  २) विदर्भ सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 नागपूर  ३) कोकण सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 ठाणे   ४) तापी सिंचन विकास महामंडळ 👉 1997 👉 जळगाव  ५) गोदावरी - मराठवाडा सिंचन विकास महामंडळ 👉१९९८ 👉 औरंगाबाद