🎯 भारतीय संविधानातील रिट्स ( Writs) (कलम 32(2)) 🎯
(१) देहोपस्थिती (Habeas Corpus) :यान्वये एखाद्या व्यक्तीची अटक ही कायदेशीर आहे की नाही ते तपासण्यासाठी न्यायालय शासकीय अधिकाऱ्यांना अथवा इतर व्यक्तींना अटक केलेल्या व्यक्तीस, न्यायालयात हजर करण्याचा आदेश देतात.
(२) परमादेश (Mandamus) :
यानुसार न्यायालय शासकीय अधिकाऱ्यास अथवा
शासकीय विभागास त्यांचे काम करण्याचा आदेश देतात.
(३) प्रतिषेध (Prohibition) :
कनिष्ठ न्यायालयाकडून त्याच्या अधिकारक्षेत्राचे उल्लंघन
झाल्यास वरिष्ठ न्यायालय त्यांना तो खटला चालवण्यास मज्जाव करण्याचा आदेश देतात.
(४) अधिकारपृच्छा (Quo-warranto) :
या आदेशाद्वारे सदर अधिकारपदावर राहण्याचा आपणांस अधिकार आहे का हा प्रश्न न्यायालय विचारते.
(५) प्राकर्षण (Certiorari) :
या आदेशान्वये वरिष्ठ न्यायालय एखाद्या खटल्यासंबंधीची कागदपत्रे कनिष्ठ न्यायालकडून स्वतःकडे मागवू शकतात.
👌👌
ReplyDelete