Skip to main content

Posts

Showing posts from October, 2019

फोर्ब्सच्या यादीतील भारतातील 'टॉप १०' श्रीमंत व्यक्ती

 🎯 फोर्ब्सच्या यादीतील भारतातील  'टॉप १०' श्रीमंत व्यक्ती 🎯 भारतातील श्रीमंत व्यक्तीचे एकूण संपत्ती  खालील प्रमाणे :- १) मुकेश अंबानी -३.५ लाख कोटी २) गौतम अदानी - १.१० लाख कोटी ३) हिंदुजा ब्रदर्स - १.०९ लाख कोटी ४) पालोनजी मिस्त्री - १.०५ लाख कोटी ५) उदय कोटक - १.०२ लाख कोटी ६) शिव नादर - १.००८ लाख कोटी ७) राधाकृष्ण दमानी - १.००१ लाख कोटी ८) गोदरेज फॅमिली - ८४००० कोटी ९) लक्ष्मी मित्तल - ७३५०० कोटी १०) कुमारमंगलम बिरला - ६७२०० कोटी. 

देवराई (Sacred grove)

   देवराई (Sacred grove)    👉 देवाचा नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे ‘देवराई’.   👉 हे परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वनखात्या सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले ‘अभयारण्य’ होय.   👉 देवाच्या  नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते.   👉 भारतात अशा 13000 पेक्षा अधिक देवराई नोंद आहेत. 

तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर ( Physics Nobel Prize 2019)

🎖 तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर 🎖    👉 जेम्स पेबल्स यांना भौतिक ब्रह्मांड विज्ञानातील सैद्धांतिक शोध  यासाठी मिळाला आहे.     👉 मिशेल मेयर आणि डिडिएर क्लोझ या दोघांना संयुक्त रित्या सौर-प्रकारच्या तारेभोवती फिरणार्‍या एक्झोप्लानेटचा शोधासाठी मिळाला आहे.

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार (Medicine Nobel Prize) 2019

🎖 वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर 🎖  👉 फिजिओलॉजी शाखेतील शोधासाठी       १) विल्यम जी केलिन ज्युनियर,       २) सर पीटर जे रॅटक्लिफ आणि       ३) ग्रेग एल सेमेन्जा  यांना संयुक्तपणे वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर झाले आहे. 👉 पुरस्कार - पेशींच्या ऑक्सिजन ग्रहणावर करण्यात आलेल्या संशोधनासाठी देण्यात आले आहे. 👉 या तिघांनाही कोशिकाएंच्या ऑक्सिजन ग्रहणावर करण्यात आलेल्या शोधासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 

आशियाई विकास बँक (ADB)

        🎯  आशियाई विकास बँक (ADB)  🎯          👉  स्थापना:   १९ सप्टेंबर १९६६          👉  मुख्यालय: मंडालूयोंग, मेट्रो मनिला, फिलिपिन्स.           अध्यक्ष    ताकीहीको नकाओ

जगातील काही महत्वाचे वाळवंट (walvant)

🎯 जगातील काही महत्वाचे वाळवंट 🎯 🎯वाळवंट               🎯 ठिकाण  १) सहारा                  उत्तर आफ्रिका  २) लिबिया                उत्तर आफ्रिका ३) ग्रेट व्हिक्टोरिया      ऑस्ट्रेलिया  ४) ग्रेट सँडी               ऑस्ट्रेलिया ५) अरेबियन                इजिप्त ६) गोबी                      चीन व मंगोलिया ७) कलहारी                 मध्य आफ्रिका ८) ताकलमकन           चीन ९) काराकुम               तुर्कमेनिस्तान १०) थर                     भारत व पाकिस्तान ११) आटाकामा           चिली (द. अ...

जगातील प्रमुख देशातील महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्याचे वर्ष (Women Voting Right)

 🎯  जगातील प्रमुख देशातील महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्याचे वर्ष  🎯  💥 जगातील प्रमुख देश व तेथील महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्याचे वर्ष   👉 अमेरिका : १९२०   👉 युनायटेड किंग्डम : १९२८   👉 फ्रान्स : १९४५   👉 जपान : १९४५   👉 इस्राएल : १९४८   👉 भारत : १९५०   👉 स्वित्झर्लंड : १९७१

भारतातील काही दबाव गट  ( pressure group)

    🎯  भारतातील काही दबाव गट   🎯 (१) व्यावसायिक क्षेत्र :      फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI), कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) इत्यादी. (२) कामगार संघटना :     भारतीय राष्ट्रीयकामगार संघटना (INTUC), ऑल इंडिया ट्रेंड युनियन काँग्रेस (AITUC), भारतीय मजदूर संघ (BMS), हिंद मजदूर संघ (HMS) इत्यादी. (३) शेतकरी संघटना :      अखिल भारतीय किसान सभा, भारतीय किसान युनियन,शेतकरी संघटना इत्यादी. (४) विद्यार्थी संघटना :    नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI), अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP), ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (AISF), स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) इत्यादी.

भारतीय संविधानातील रिट्स ( Writs)

 🎯 भारतीय संविधानातील रिट्स ( Writs) (कलम 32(2)) 🎯 (१) देहोपस्थिती (Habeas Corpus)  :      यान्वये एखाद्या व्यक्तीची अटक ही कायदेशीर आहे की नाही ते तपासण्यासाठी न्यायालय शासकीय अधिकाऱ्यांना अथवा इतर व्यक्तींना अटक केलेल्या व्यक्तीस, न्यायालयात हजर करण्याचा आदेश देतात. (२) परमादेश (Mandamus) :     यानुसार न्यायालय शासकीय अधिकाऱ्यास अथवा शासकीय विभागास त्यांचे काम करण्याचा आदेश देतात. (३) प्रतिषेध (Prohibition) :      कनिष्ठ न्यायालयाकडून त्याच्या अधिकारक्षेत्राचे उल्लंघन झाल्यास वरिष्ठ न्यायालय त्यांना तो खटला चालवण्यास मज्जाव करण्याचा आदेश देतात. (४) अधिकारपृच्छा (Quo- warranto) :       या आदेशाद्वारे सदर अधिकारपदावर राहण्याचा आपणांस अधिकार आहे का हा प्रश्न न्यायालय विचारते. (५) प्राकर्षण (Certiorari) :        या आदेशान्वये वरिष्ठ न्यायालय एखाद्या खटल्यासंबंधीची कागदपत्रे कनिष्ठ न्यायालकडून स्वतःकडे मागवू शकतात.

सार्क (SAARC)

 🎯 दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना  सार्क (SAARC) 🎯  👉 स्थापना :- १९८५ .  👉 मुख्यालय :- काठमांडू  👉 सार्कमध्ये एकूण ८ सदस्य राष्ट्रे आहेत.  👉 सदस्य देश:- अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूटान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका.

अध्यक्षीय पद्धत आणि अध्यक्षीय पद्धत असलेले देश

              🎯 अध्यक्षीय पद्धत   🎯  👉 अध्यक्षीय पद्धतीत कार्यकारी प्रमुख हे मर्यादित काळासाठी लोकांकडून निवडले जातात. या कार्यकारी प्रमुखांना अध्यक्ष असे म्हणतात. म्हणून या पद्धतीला अध्यक्षीय पद्धत असे म्हणतात.  👉 राष्ट्रप्रमुख व शासनप्रमुख ही दोन्ही पदे अध्यक्ष भूषवतात. अध्यक्षांना संविधानाने अधिकार दिलेले असतात.  👉 कायदेमंडळाकडून बनवलेल्या कायद्यानुसार शासनाचा कारभार चालवणे हा त्यांचा प्रमुख अधिकार आहे. अध्यक्ष त्यांच्या इच्छेनुसार मंत्री अथवा राजदूत यांची अधिकारी म्हणून नियुक्ती करतात. या पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळातील सदस्यांना कायदेमंडळाचे सदस्य होता येत नाही.  💥 अध्यक्षीय पद्धत असलेले देश   👉 अमेरिका,मेक्सिको, ब्राझील, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका इत्यादी.

संसदीय पद्धत आणि ही पद्धत असलेले देश

    🎯   संसदीय पद्धत  🎯 👉 संसदीय पद्धतीत  राष्ट्रप्रमुख   व शासनप्रमुख भिन्न असतात. राष्ट्रपती अथवा  राजा किंवा राणी हे राष्ट्रप्रमुख  असतात, तर प्रधानमंत्री हे शासनप्रमुख असतात.  👉 राष्ट्रपती वा राजा, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचे  मिळून कार्यकारी मंडळ बनते.    राष्ट्रपती अथवा राजा  हे नामधारी प्रमुख असतात, परंतु वास्तविक सत्ता ही प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते.  💥 संसदीय पद्धत असलेले देश 💥   👉 भारत,युनायटेड किंग्डम, जर्मनी, इटली, जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इत्यादी.

युनायटेड किंग्डम आणि ग्रेट ब्रिटन यामधे फरक काय आहे??

🎯  युनायटेड किंग्डम आणि ग्रेट ब्रिटन यामधे फरक काय आहे?? 🎯  👉 युनायटेड किंग्डम हे चार भौगोलिक प्रांत मिळून बनले आहे .  👉  यामध्ये इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड याचा समावेश होतो.  👉 भौगोलिकदृष्ट्या इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स हे ग्रेट ब्रिटन या बेटाचे भाग आहेत.  👉 उत्तर आयर्लंड आणि आयर्लंडचे प्रजासत्ताक हे एका वेगळ्या बेटावर आहेत.  👉 यांतील उत्तर आयर्लंड हा युनायटेड किंग्डमचा भाग आहे, तर आयर्लंडचे प्रजासत्ताक हा एक वेगळा देश आहे.  👉 युनायटेड किंग्डम या नावाऐवजी ब्रिटन किंवा इंग्लंड हेही शब्द वापरले जातात.

भारतात मूलभूत उद्योग

        🎯 भारतातील मूलभूत उद्योग 🎯  👉 भारतात  ८ प्रमुख उद्योगांना मूलभूत उद्योग (Core Industries) म्हणतात.  👉 या मूलभूत उद्योगात सर्वाधिक वाटा उतरत्या क्रमाने:-     १. पेट्रोल शुद्धीकरण प्रकल्प - २८.०४%     २. विद्युत निर्मिती - १९.८५%     ३. लोहपोलाद उद्योग - १७.९२%     ४. कोळसा उद्योग - १०.३३%     ५. कच्चे तेल उत्पादन - ८.९८%     ६. नैसर्गिक वायू उत्पादन - ६.८८%     ७. सिमेंट उद्योग - ५.३७%     ८. खते उद्योग - २.६३%

महाराष्ट्रातील पाटबंधारे विकास महामंडळ

 🎯 महाराष्ट्रातील पाटबंधारे विकास महामंडळ 🎯 👉  महाराष्ट्रात पाटबंधारे विकास महामंडळाची  संख्या ५ आहेत. ते पुढील प्रमाणे :- १. कृष्णा खोरे विकास महामंडळ २. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ ३. तापी पाटबंधारे विकास महामंडळ ४. मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ ५. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ