Skip to main content

Posts

Showing posts from August, 2019

प्रशिक्षण संस्था

💥 प्रशिक्षण संस्था 💥 👉अनुसूचित जाती (SC) - BARTI (बार्टी) 👉मराठा (SEBC) - SARTHI (सारथी) 👉OBC, NT, SBC - महाज्योती 👉आर्थिक दुर्बलांसाठी  -अमृत संस्था 🏵स्पर्धा परीक्षा, परदेशी उच्च शिक्षण, व्यवसाय, नोकरी यासाठी या संस्था प्रशिक्षण देणार आहे. 

रविश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार

 🎖 रविश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार 🎖 👉एनडीटीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक आणि त्या चॅनेलवरील प्राईम टाईम या शोचे होस्ट रवीश कुमार आशियातील नोबेल समजला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. वास्तवदर्शी पत्रकारितेचा वसा घेतलेल्या रवीश कुमार यांची देशातील सार्वकालिक महान पत्रकारांमध्ये गणना होते.रवीश कुमार यांनी १९९६ पासून एनडीटीव्हीमध्ये कार्यरत आहेत.   👉 रवीश कुमार यांच्यासह अन्य चार विजेत्यांमध्ये म्यानमारचे को स्वे विन, थायलंडमधील अंगखाना नीलापजीत, फिलीपिन्समधून रेमंडो पुजांते कैयाब आणि दक्षिण कोरियामधील किम जोंग यांनाही हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

आधुनिक भारताचे जनक

          💥 आधुनिक भारताचे जनक 💥 👉आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय. 👉आधुनिक भारताचे शिल्पकार- पंडित जवाहरलाल नेहरू. 👉भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी. 👉भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी. 👉भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य  टिळक. 👉भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार– सरदार वल्लभभाई पटेल. 👉मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर. 👉भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके. 👉भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा. 👉आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.  👉आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत. 👉स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक- लॉर्ड रिपन.  👉भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.  👉भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.  👉भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे. 👉भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.  👉भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.

प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे

🏵 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे 🏵 👉 हिंदू नेपोलियन --  स्वामी विवेकानंद 👉 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री 👉 कैद-ए-आजम -- बॅ. जीना 👉 शहीद-ए-आलम --  भगतसिंग 👉 लोकनायक -- बापूजी अणे 👉 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू 👉 गान कोकिळा -- लता मंगेशकर 👉 आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम् 👉 गरिबांचे कैवारी -- के. कामराज 👉 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी 👉 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद 👉 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल 👉 पंजाबचा सिंह --  राजा रणजितसिंग 👉विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी 👉 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर 👉 समर सौदामिनी -- अरुणा आसफअली 👉 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी 👉 शांतीदूत -- पंडित नेहरू

रिजर्व बँक ऑफ इंडिया

🏦 रिजर्व बँक ऑफ इंडिया🏦 👉 स्थापना - १ एप्रिल १९३५ 👉 RBI ACT - १९३४ 👉सुरवातीला RBI चे भाग भांडवल - ५    कोटी रुपये 👉 RBI चे कार्यक्षेत्र सम्पूर्ण भारत 👉स्वातंत्र्यापूर्वी १९४२ पर्यंत ब्रम्हदेश आणि स्वातंत्र्यानंतर ३० जून  १९४८पर्यंत पाकिस्तान ची मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहले 👉RBI चे राष्ट्रीयीकरण - १९४९ 👉RBI पहिले गव्हर्नर - स्मिथ 👉 RBI पहिले भारतीय गव्हर्नर आणि    पहिले महाराष्ट्रीयन गव्हर्नर - CD    देशमुख 👉 मुख्यालय - मुंबई (  १९३७ पर्यंत कोलकत्ता) 👉सध्याचे गव्हर्नर - शशिकांत दास(२५ वे)

पाकिस्तानने केली 'गझनवी' क्षेपणास्त्राची चाचणी

पाकिस्तानने केली 'गझनवी' क्षेपणास्त्राची चाचणी  💥भारताने जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने बलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करत भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे.  या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये  खालीलप्रमाणे: - 👇👇👇👇👇👇 🚀२९० किलोमीटरपर्यंत या क्षेपणास्त्राची मारक क्षमता. 🚀जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र. 🚀 गझनवी आकाराने मोठे असल्याने मोठे बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता. 🚀 स्वतःसाठी लागणारे इंधन व ऑक्सिजन बरोबर ठेवण्याची व्यवस्था. 🚀अणू युद्धासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. 🚀गझनवीचे वजन- ५ हजार २५६ किलो. 🚀क्षेपणास्त्राची उंची- ९.६४ मीटर. 

फिट इंडिया’ अभियान

💪 ‘ फिट इंडिया’ अभियान💪 ⚽ 29 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी        ‘फिट इंडिया’ अभियानाचा प्रारंभ केला. ⚽ मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून या लोकचळवळीचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली. ⚽ तंत्रज्ञानामुळे आपली शारीरिक क्षमता घटली आहे आणि आपले आरोग्याचे दैनंदिन वेळापत्रक कोलमडून गेले आहेत. आज भारतात जीवनशैलीसंबंधी आजार वाढत आहेत. जीवनशैलीतला थोडासा बदल हे जीवनशैलीचा आजार रोखू शकतो. ‘फिट इंडिया अभियान’ हे जीवनशैलीतले छोटे बदल घडवण्याचा एक प्रयत्न आहे.

सार्वजनिक क्षेत्रात आता फक्त 12 बँका

सार्वजनिक क्षेत्रात आता फक्त 12 बँका 1. पंजाब नेशनल बँक+यूनाइटेड बँक+ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स 2. केनरा बँक+सिंडिकेट बँक 3. इंडियन बँक +इलाहाबाद बँक 4. बँक ऑफ इंडिया+आंध्रा बँक+कॉरपोरेशन बँक 5. बँक ऑफ इंडिया 6. बँक ऑफ बड़ौदा 7.  बँक  ऑफ महाराष्ट्र 8. सेंट्रल बँक ऑफ इंडिया 9. इंडियन ओवरसीज बँक 10. पंजाब एंड सिंध बँक 11. भारतीय स्टेट बँक 12. यूको बँक

दहा बँकांचे विलीनीकरण होणार

💰 दहा बँकांचे विलीनीकरण होणार 💰 👉सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलीनीकरण करून त्यातून चार नव्या बँकांची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. यामध्ये पुढील बँका विलीन होणार. 👉पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या चारही बँकांच्या विलीनीकरणातून अस्तित्वात येणारी बँक देशातील दुसरी सर्वात मोठी बँक ठरणार आहे. 👉कॅनरा बँक आणि सींडिकेट बँक यांचं विलीनीकरण होईल. त्यातून अस्तित्वात येणारी बँक देशातील चौथी सर्वात मोठी बँक असेल. 👉युनियन बँक, आंध्रा बँक आणि कार्पोरेशन बँक  या तीन बँकांच्या विलीनीकरणातून अस्तित्वात येणारी बँक देशातील पाचवी सर्वात मोठी बँक ठरणार आहे. 👉इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक यांचं विलीनीकरण होईल. त्यातून अस्तित्वात येणारी बँक देशातील सातवी सर्वात मोठी बँक असेल. 👉केंद्राच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या आता २७ वरून १२ वर येणार आहे.

पुरस्कार विजेते

🏅 पुरस्कार विजेते 🏅 🎖 राजीव गांधी खेल रत्न -         बजरंग पुनिया ( कुस्ती) व         दीपा मलिक ( पॅरा अथलिट) 🎖द्रोणाचार्य पुरस्कार -          विमल कुमार ( बॅडमिंटन),          संदीप गुप्ता ( टेबल टेनिस),          मोहिंदर सिंग ढिल्लोन ( अॅथलिट) 🎖जीवनगौरव पुरस्कार -          मेर्झबान पटेल ( हॉकी),          रंबीर सिंग खोक्कर ( कबड्डी),          संजय भरद्वाज ( क्रिकेट) 🎖अर्जुन पुरस्कार -          तजिंदरपाल सिंग तूर ( अॅथलिट),          मोहम्मद अनास याहीया ( अॅथलिट),          एस भास्करन ( बॉडीबिल्डींग),          सोनिया लाथेर ( बॉक्सिंग),          रवींद्र जडेजा ( क्रिकेट),          चिंग्लेनसाना सिंग कंगुजान ( हॉकी),     ...

इस्रोच्या भविष्यातील मोहिमा

🚀🚀 इस्रोच्या भविष्यातील मोहिमा🚀 🚀 इस्रो २०२२ साली गगनयान मोहिमेअंतर्गत तीन व्योमनॉट्स अंतराळात पाठवणार आहे.   २०२३ मध्ये इस्रो शुक्र ग्रहावर यान पाठवणार आहे. २०२९ पर्यंत भारत अंतराळात स्वत:चे अंतराळ स्थानक (स्पेस स्टेशन) तयार करणार आहे.   २०२५ ते २०३० च्या दरम्यान भारत चंद्रावर मानवरहीत यान पाठवण्याच्या तयारीत आहे.   इस्रो कॉस्मीक रेडिएशनच्या अभ्यासासाठी २०२० मध्ये ‘एक्सपोसॅट मोहिम’ ,  २०२१ मध्ये सुर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल वन’ मोहिम  २०२२ मध्ये ‘मंगळ परिक्रमा मोहिम-२’.  २०२४ मध्ये ‘चांद्रयान ३’,  सुर्यमालेचा अभ्यास करण्यासाठी २०२८ साली एक मोहिम राबवणार आहे. 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार भारताचे मानवरहित रोव्हर

  अंतराळ संशोधनात मोठी झेप घेण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. अजुनही फारसे संशोधन न झालेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत मानवरहित रोव्हर उतरविणार आहे.    येत्या  सात सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची शक्यता आहे. १४.१ कोटी डॉलर खर्चाच्या या चांद्रयान-२ मोहिमेद्वारे चंद्राच्या जमिनीखालील खनिजांचा शोध घेण्यात येईल. या ग्रहाच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करणे, तेथे पाण्याचा शोध घेणे अशी कामे मानवरहित रोव्हर करणार  आहे.    इस्रोचे सर्वात शक्तीशाली रॉकेट जीएसएलव्ही मार्क 3च्या मदतीने हे प्रक्षेपण झाले होते. या यानाचे तीन भाग आहेत ऑर्बिटर, लैंडर (विक्रम) आणि रोवर (प्रज्ञान).     या यानाचा कार्यकाळ एक वर्ष असून चंद्रावरील एक दिवस हा भारताच्या १४ दिवसांबरोबर असतो.

२०१९ मधील आतापर्यंतच्या लष्करी सराव

🏹 २०१९ मधील आतापर्यंतच्या लष्करी सराव 🏹  ● इम्बेक्स २०१८-१९:-   *भारत आणि म्यानमार  ●संप्रिती २०१९ :-   *भारत आणि बांगलादेश वरुण 19.1:-  *भारत आणि फ्रान्सचा संयुक्त कवायत.  सिम्बेक्स-2019:-   *भारत आणि सिंगापुर यांच्या मध्ये सिम्बेक्स-2019 हा युद्ध अभ्यास.  ●“IN-VPN BILAT EX”   * भारत आणि व्हिएतनाम यांच्या नौदलांचा संयुक्त सागरी सराव.  ●अल नागह 2019”:-    *  भारत आणि ओमान यांच्या “अल नागह 2019” नावाच्या संयुक्त युद्ध सराव.  ●AUSINDEX  - 2019    * भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या AUSINDEX या सयुक्त नौदल सराव.  ●बोल्ड कुरुक्षेत्र-2019   * भारत आणि सिंगापुर या दोन्ही देशामधला १२ वा सयुक्त सैन्य अभ्यास.  ●मित्र शक्ती-६:   * भारत आणि श्रीलंका यांचा ‘मित्र शक्ती-६ ” हा संयुक्त लष्करी सराव. 

भारतातील वाघांची संख्या

🐯 भारतातील वाघांची संख्या🐯 भारतातील वाघांची सर्वाधिक संख्या - मध्यप्रदेश(526) राज्यात आहे.      ●कर्नाटक - 524      ●उत्तराखंड - 442      ●महाराष्ट्र - 312      ●तामिळनाडू - 264

एस धामी देशाची पहिली महिला फ्लाइंग युनिट कमांडर

🚀भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर एस धामी यांनी फ्लाइंग युनिटच्या पहिल्या महिला फ्लाइट कमांडर ठरण्याचा मान मिळवला आहे. 🚀 त्या ही महत्वाची जबाबदारी मिळालेल्या देशातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. 🚀विंग कमांडर एस धामी हिंडन एअरबेसवर चेतक हेलिकॉप्टरच्या युनिटच्या फ्लाइट कमांडर पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. 🚀वायुसेनेच्या कमांड युनिटमध्ये फ्लाइट कमांडरचे पद हे दुसऱ्या क्रमांकाचे पद असते. 🛩🛩🛩🛩✈✈✈✈✈🛩🛩🛩✈✈✈✈🛩🛩

महोत्सव

महोत्सव १. रौप्य महोत्सव (Silver Jubilee) = २५ वर्ष २. सुवर्ण महोत्सव (Golden Jubilee) = ५० वर्ष ३. हिरक महोत्सव (Diamond Jubilee) = ६० वर्ष ४. अमृत महोत्सव (Platinum jubilee) = ७५ वर्ष ५. शताब्दी महोत्सव (Centenarian Jubilee) = १००        वर्ष  

राष्ट्रीय दर्जा असणारे पक्ष

●17 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीनंतर नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) ला देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळाला आहे.  यामुळे आता राष्ट्रीय पक्ष दर्जा असणारे आठ पक्ष झाले आहे.  1.काँग्रेस 2. भाजप 3. बहुजन समाज पक्ष 4.भारतीय कम्युनिस्ट पक्ष 5. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 6.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 7. अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस. 8.नॅशनल पीपल्स पार्टी (NPP)

डेटा वापरण्यात महाराष्ट्र अव्वल

डेटा वापरण्यात महाराष्ट्र अव्वल केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे (ट्राय) "डेटा सबस्क्रिप्शन रिपोर्ट" अहवाल जारी -इंटरनेट वापरून वेगवेगळ्या साईट सर्फिंगमध्ये 'महाराष्ट्र' देशात प्रथम स्थानी ●2018 वर्षात 'डेटा' वापराचा आधार घेत अहवाल ●देशातील डेटा वापरात अग्रेसर 5 राज्ये  1. महाराष्ट्र (4 कोटी 80 लाख नागरिक)  2. आंध्रप्रदेश (4 कोटी 40 लाख)  3. तामिळनाडू (4 कोटी 10 लाख)  4. उत्तरप्रदेश (4 कोटी)  5. कर्नाटक (3 कोटी 6 लाख) भारतात 4G चा वापर 86% इंटरनेट वापरकर्ते करतात.

तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2018

तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2018 पुरस्कार विजेते :- 1.जीवनगौरव पुरस्कार - वांगचूक शेर्पा 2.भू साहस – गिर्यारोहक अपर्णा कुमार, दिवंगत दिपंकर                           घोष, मनिकंदन के. 3.जल साहस - जलतरणपटू प्रभात राजू कोळी 4.हवाई साहस - रामेश्वर जांग्रा हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतील.  यामध्ये मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराबद्दल :-     तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार दरवर्षी साहसी क्षेत्रात व्यक्तींच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारच्यावतीने दिला जातो. या पुरस्काराचे भू, जल, हवाई साहस आणि जीवन गौरव पुरस्कार अशा चार भागात वर्गीकरण करण्यात येते. 

ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे

 ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे  १)  १७७३ -रेग्युलेटिंग अॅक्ट २)  १८२९ -सतीबंदी कायदा ३)  १८३५- वृत्तपत्र कायदा ४)  १८५४ -वूड्सचा शिक्षणविषयक खलिता ५)  १८५६ -विधवा पुनर्विवाह कायदा ६)  १८५८ -राणीचा जाहीरनामा ७)  १८६०- इंडियन पिनल कोड ८)  १८६१- इंडियन हायकोर्ट अॅक्ट ९)  १८७८- व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट १०)  १८८२ -देशी वृत्तपत्र कायदा ११)  १८८३ -इलबर्ट बिल कायदा १२)  १८९२ -कौन्सिल अॅक्ट १३)  १९०४ -भारतीय विद्यापीठ कायदा १४)  १९०४- प्राचीन वस्तुजतन कायदा १५)  १९०४ -सहकारी पतसंस्था कायदा १६)  १९०९ -मोर्ले मिंटो सुधारणा कायदा १७)  १९१९- मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा १८)  १९१९ -रौलेक्ट कायदा १९)  १९३५ -भारत सरकार कायदा २०)  १९४५- वेव्हेल योजना २१)  १९४५ -त्रिमंत्री योजना २२)  १९४७ -माउंटबॅटन योजना २३)  १९४७- भारतीय स्वातंत्र्याचा कायदा

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पी.व्ही.सिंधूचे यश

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद प्राप्त करणारी प्रथम भारतीय खेळाडू - पी.व्ही.सिंधू ठरली आहे. यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पी.व्ही.सिंधूचे यश        2013 ,2014- 🥉कांस्यपदक        2017,2018-  🥈रौप्यपदक        2019           - 🥇सुवर्णपदक भारतास जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आजपर्यंत - 10 पदके(त्यातील 5 पदके पी.व्ही.सिंधुची)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत या नागरी पुरस्कारांनी सन्मान

संयुक्त अरब अमिरात- ऑर्डर ऑफ जायेद बहरिन- द किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसाॅ रशिया-सेंट एंड्रयू अवार्ड मालदीव -  ऑर्डर ऑफ डिस्टिंग्वुइश रुल ऑफ इझुद्दीन दक्षिण कोरिया-सियोल शांती पुरस्कार फिलिस्तीन- ग्रँड कॉलर सन्मान संयुक्त राष्ट्र ( UN) - चैंपियन ऑफ द अर्थ अफगाणिस्तान- अमिर अमानुल्लाह खान पुरस्कार सौदी अरेबिया- किंग अब्दुलअझीझ सैश